Essay on Joker in Marathi 2021 – मी जोकर बोलतोय

Essay on Joker in Marathi :- तुम्हाला खूप हसवणारा मी जोकर बोलतोय. नमस्कार मित्रांनो मी जोकर. माझं नाव जोकर आहे. होय, मी जोकर बोलतोय. तुम्ही जेव्हा तुमच्या आई बाबांबरोबर सर्कस बघायला येता तेव्हा तुम्हाला मी दिसतो तोच मी जोकर. काही लोक मला विदुषक ही बोलतात.

Essay on Joker in Marathi in 50 Words

मी लहानपणापासूनच उंचीने बुटका होतो. शाळेत मुले मला खूप चिडवायची आणि मला खूप वाईट ही वाटायचे. परंतु मी ठरवले होते कीं आपण आपल्या या कमीला सकारात्मकरित्या उपयोगात आणूया. पुढे जाऊन घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे मला आणि माझ्या बहिणीला शिक्षण अर्धवट सोडून सर्कस मध्ये काम करावे लागले. पण इथे मला माझ्या याच कमी उंचीमुळे काम मिळाले. मला जे काम मिळाले ते जोकरचे होते आणि जराही निराश ना होता मी ते काम आनंदाने स्वीकारले.

Essay on Joker in Marathi in 100 Words

हळू हळू मी लोकांना हसवायच्या कारामतींचा सराव करू लागलो. खूप चेंडू हवेत उडवणे असो किंवा सायकलच्या चाकावरून पूर्ण तंबुला गोल गोल चकरा मारणे असो किंवा तुम्हाला हसवण्यासाठी स्वतः उठणे – पडणे किंवा घसरणे असो मी मनापासून हया सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या.

हळू हळू दिवस निघत गेले आणि मला जाणवू लागले की माझे काम तुम्हा सर्व मुलांना आवडते आहे. तुम्ही मला परत परत बघायला आई बाबांना घेऊन येऊ लागलात. तुमच्यातील काही छोटी दोस्त मंडळी तर खेळ संपल्यावर मला भेटायला तंबूत ही येऊ लागले. खरंच, तुम्हा सगळ्या छोट्या दोस्त मंडळींना भेटून मला एवढा आनंद होतो की मी तुम्हाला हा सगळं अनुभव शब्दात सांगू शकत नाही.

मी जेव्हा सगळे चेंडू हवेत फिरवतो तेव्हा लोकांच्या टाळ्या वाजतात ते बघून मला माझ्या कामाची पोचपावतीच मिळते जणू. अस्वलाच्या पिंजऱ्याजवळ जाऊन जेव्हा मी टिवल्या बावल्या करतो तेव्हा तुम्ही मुले खदखदून हसता आणि तुमचे आई बाबा पण खूप हसतात. हत्ती जेव्हा तुम्हाला सलाम करतात तेव्हा त्याच्या पुढे उभा राहून मी ही त्याची नक्कल करतो हे ही सर्वाना हसवते.

माझे काम हेच आहे कीं तुम्ही सर्कस बघायला आलेले आहात ते दोन तास जितके होऊ शकेल तितके मी तुमचे मनोरंजन करावे आणि तुम्ही मुलांनी सर्कशित घालविलेले हे दोन तास तुम्हाला नेहमी नेहमी लक्षात राहावे.

Leave a Comment